कुणाला घाबरून सभा रद्द केलेली नाही: इम्तियाज जलील

Foto
औरंगाबाद :  शहराच्या कायदा- सुव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहेत. त्यामुळे अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेची चिंता भाजपच्या पदाधिकाऱ्यानी करू नये, असा सल्ला  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
अकबरुद्दीन ओवेसींच्या सभेला शहरात परवनागी देऊ नये, त्यांच्या चिथवणीखोर भाषणाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन व्यक्त केली होती. 
इम्तियाज जलील म्हणाले, शहरातील वातवरण कुणामुळे बिघडते हे पोलीस आयुक्तांना माहित आहे. तेव्हा भाजपने ओवेसी यांच्या सभेमुळे शहरात तणाव निर्माण होईल, दंगल होईल याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही.

दोन चार दिवसापूर्वी  भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर झालेला हल्ला, दगडाने फोडलेल्या गाड्या पाहता या पक्षातील गुंडांनी कायदा व सुव्यवस्थेची भाषा करावी हे जरा जास्त झाले आहे. राहिला प्रश्न अकबरुद्दीन ओवोसी यांच्या सभेचा, तर आम्ही कालच ही सभा रद्द झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामागे त्यांची प्रकृती बरी नसणे हे कारण आहे. कुणाच्या दबावाला बळी पडलो, किंवा घाबरलो म्हणून सभा रद्द केलेली नाही.

महापालिकेच्या निवडणुका दोन महिन्यांवर आलेल्या असताना शिवसेना-भाजपला पुन्हा संभाजीनगरची आठवण झाली आहे. वीस वर्ष महापालिकेच्या सत्तेत आणि पाच वर्ष राज्याच्या सत्तेत हे दोन्ही पक्ष मांडीला मांडी लावून बसले होते. तेव्हा या शहराचे संभाजीनगर त्यांनी का केले नाही? फक्त निवडणुकीत त्यांना जाग कशी येते? पण लोक आता हुशार झाले आहेत, त्यांना सगळं कळंत. शिवसेना- भाजपने जनतेला मुर्ख समजू नये, असा टोला  इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker